YouTubeबद्दल
प्रत्येकाला एक आवाज देणे आणि त्यांना जग दाखविणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा एक आवाज असावा असे आम्हाला वाटते. सर्वांच्या कहाण्या ऐकत, त्या कहाण्या शेअर करत आपण एका समुदायाची उभारणी करतो तेव्हा हे जग अधिक चांगले ठिकाण बनते असे आम्हाला वाटते.
आमची मूल्ये चार आवश्यक स्वातंत्र्यांवर आधारित आहेत आणि ती मूल्ये म्हणजे आमची ओळख आहेत.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
लोकांना मोकळेपणाने बोलता यावे, आपली मते मांडता यावीत, संवाद सुरू करता यावा आणि या कलात्मक स्वातंत्र्याने नवीन आवाज मिळण्यात, फॉरमॅट आणि शक्यता निर्माण होण्यात मदत होते असे आम्हाला वाटते.
माहिती स्वातंत्र्य
प्रत्येक व्यक्तीला माहिती खुलेपणाने उपलब्ध असावी आणि व्हिडियो हे शिक्षणाचे, सामंजस्य वाढवण्याचे व जगातील छोट्या-मोठ्या घडामोडीची खबर ठेवण्याचे एक शक्तिशाली माध्यम आहे असे आम्हाला वाटते.
संधी स्वातंत्र्य
प्रत्येक व्यक्तीला आपल्या वेगळेपणाने उठून दिसण्याची, व्यवसाय उभा करण्याची आणि स्वतःच्या हिंमतीवर यशस्वी होण्याची संधी मिळाली पाहिजे असे आम्हाला वाटते. काय लोकप्रिय आहे हे लोक ठरवतील—गेटकीपर— ते ठरवू शकणार नाहीत.
संबद्ध असण्याचे स्वातंत्र्य
प्रत्येक व्यक्तीला आपला वाटेल असा समुदाय मिळाला पाहिजे, सर्व अडथळे, सीमा उल्लंघता आ्ल्या पाहिजेत आणि समान आवडी व रस असणा-या व्यक्तींशी नाते जोडता आले पाहिजे असे आम्हाला वाटते.